#

Advertisement

Saturday, September 14, 2024, September 14, 2024 WIB
Last Updated 2024-09-14T13:22:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"तुतारी" हाती घेणाऱ्यांच्या यादीत हर्षवर्धन पाटील आणि राजन पाटील यांचे नाव

Advertisement

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं वजन वाढल्याचे पाहिला मिळालं आहे. त्यामुळेच आता शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या पक्षात नुकतंच कागल विधानसभेसाठी मागील ५ वर्षांपासून तयारी करणारे भाजपचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी प्रवेश केला. ज्यावेळी हा प्रवेश पार पडला त्यावेळी शरद पवार यांनी घाटगेंना निवडून द्या, त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणा केली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या वाढायला लागल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आगामी काळात कोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात याची प्राथमिक यादी तयार करण्यात आले आहे.  

आगामी काळात कोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात

१) मदन भोसले- वाई विधानसभा
२) विवेक कोल्हे- कोपरगाव विधानसभा
३) बाळा भेगडे- मावळ विधानसभा
४) जगदीश मुळीक- वडगाव शेरी
५) हर्षवर्धन पाटील- इंदापूर
६) प्रशांत परिचारक- पंढरपूर- मंगळवेढा
७) राजन पाटील - मोहोळ विधानसभेत वर्चस्व
८) दिलीप सोपल- बार्शी
९) रणजीत शिंदे (बबन शिंदे यांचा मुलगा)- माढा विधानसभा
१०) रमेश कदम- मोहोळ विधानसभा