Advertisement
पोलीस तपासाची चक्रं फिरली, दोघांना अटक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. रूपाली चाकणकर यांच्यावतीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या 32 जणांची लिस्ट सायबर क्राईमला देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांवर कलम 72/ 2024, कलम 354 ड, 509, 34 या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. सन्नी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे.
यापूर्वीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले होते.
