#

Advertisement

Monday, September 9, 2024, September 09, 2024 WIB
Last Updated 2024-09-09T11:58:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी....'

Advertisement

शरद पवार अन् हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनरने भुवया उंचावल्या 

पुणे : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता राजकारणात सुरू असलेलं बॅनर वॉर चांगलंच चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी .....हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी.... असं लिहण्यात आलं आहे. 
इंदापूरच्या बाजारात एक फ्लेक्स भर चौकात लागला आहे, तो सध्या सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर चर्चेचा विषय ठरत आहे.  त्यावर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो आहेत. तर मजकूर अचंबित करत होता. कारण कालच पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या गणपतीच्या दर्शनाचे वेळी तुतारी ही फक्त माध्यमातच आहे. आम्ही आहे तिथेच आहोत, असे सांगितले.  तर आज इंदारपुरात लागलेला हा बॅनर वेगळ्या वळणावर असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.