Advertisement
सोलापूर : अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजा कार्यक्रमात चालू गळीत हंगामासाठी 3500 रुपयांचा भाव जाहीर करीत मास्टरस्ट्रोक लागवल्याने अनेक साखर सम्राटांचे धाबे दणाणले. आहेत. अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढविण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास एक लाख पंधरा हजार मतदान आहे. याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो . गेल्यावर्षी अभिजित पाटील यांनी तब्बल 10 लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 3 हजार रुपये प्रतिटन एवढा भाव दिला होता . आता यावर्षी रोलर पूजन कार्यक्रमातच पाटील यांनी या हंगामात 3500 रुपये भाव देण्याची घोषणा केल्याने माढ्याचे साखर सम्राट व आमदार बबनदादा शिंदे , पंढरपूरचे परिचारक , अकलूजच्या मोहिते पाटील अशा नेत्यांनाही अशाच पद्धतीने भाव द्यावा लागणार आहे . एकाबाजूला अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेसाठी जोरदार तयारी करीत सातत्याने माढा मतदारसंघ पिंजून काढत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या हंगामाचा विक्रमी भाव जाहीर केल्याने हा त्यांच्यासाठी मास्टरस्ट्रोक ठरणार आहे.
माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या बबनदादा शिंदे अथवा दादासाहेब साठे या दोन्ही साखर कारखानदाराना अभिजित पाटील यांच्याप्रमाणेच भाव द्यावा लागणार आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून तो राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे. आमदार शिंदे यांचे राजकारणाचा बेसही ऊस उत्पादक शेतकरी असून आता त्यांच्या टाकाटीवरच अभिजित पाटील यांनी घाव घालण्यास सुरुवात केल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे.
