Advertisement
काँग्रेसचा बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल
सोलापूर : दक्षिण सोलापूरच्या जागेवरून कुरुबुरू पाहायला मिळत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची मशाल विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केल आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले.. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील यांचे पूत्र अमर पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काय करायचा असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित केला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून 19 जणांनी निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं पक्षाला कळवल आहे. मविआच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात सुद्धा सांगली पॅटर्न होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची 20 सप्टेंबरला बैठक होणा आहे. त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.जागा वाटपाचं सूत्रही त्याच बैठकीत ठरवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 2019च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिंकलेल्या जागांसंबंधीत घटक पक्षाला जागा दिल्या जातील अशीही माहिती समोर येत आहे.तर दुस-या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदार संघात जो पक्ष आघाडीवर होता ती जागा संबंधित पक्षाला दिली जाईल अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
