#

Advertisement

Friday, September 20, 2024, September 20, 2024 WIB
Last Updated 2024-09-20T12:37:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडलं !

Advertisement

काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा आरोप 

तुळजापूर : देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मधुकरराव चव्हाण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात संवाद मेळावा घेतला. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मधुकर चव्हाण 1999 पासून सलग चारवेळा निवडून आलेले आहेत.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा मधुकरराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.