#

Advertisement

Saturday, September 7, 2024, September 07, 2024 WIB
Last Updated 2024-09-07T13:10:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपूर मंगळवेढ्यात उमेदवारी कोणाला?

Advertisement

महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला मिळणार तिकीट 

सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याची जागा  सध्या भाजपकडे असून तिथे सध्या समाधान अवताडे हे आमदार आहेत. या जागेसाठी भाजपचेच दोन माजी उमेदवार इच्छूक असून  राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचे त्यांचे मनसुबे असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक  आणि भीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीत या जागेंवर कोण आणि महाविकास आघाडीकडून कोण, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.