#

Advertisement

Saturday, September 7, 2024, September 07, 2024 WIB
Last Updated 2024-09-07T13:27:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली...!

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्रीवर आले होते. ईडीच्या भीतीने ते मातोश्रीत रडले होते, असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच उत्तर दिलं होतं. पोराटोरांचे प्रश्न मला विचारू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. हा समाचार घेताना शिरसाट यांची जीभ घसरली. त्यांनी थेट बापच काढला.
आदित्य तर रोज रडतो हो. आता ते काय लोकांना सांगायचं? सकाळी उठल्यावर, दुपारी उठल्यावर रडत असतो. संध्याकाळीही रडत असतो. अहो एकनाथ शिंदे कुठे? तुम्ही कुठे? एकनाथ शिंदे तुझ्या बापाच्या वयाचे आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं गैर आहे, अशा एकेरी शब्दात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. पण मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहून सव्वा दोन वर्ष झाले. एकीकडे घटनाबाह्य म्हणतात, दुसरीकडे त्यांच्याकडेच मागणी करतात. घटनाबाह्य आहे तर मागण्या कसल्या करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या जाहिराती सामनामध्ये छापता कशाला?  यांना फक्त पैसा पाहिजे. त्यांना लोकांशी काही घेणंदेणं नाही. माल आहे तर ताल आहे अशी यांची गत आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.