Advertisement
पंढरपूर : विधानसभा निवडणूकांचे एकीकडे वेध लागले असताना पंढरपुरात प्रचाराचा नवा पॅटर्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पंढरपूर शहरात गणपती मूर्ती वाटप करीत विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केल्यानं काका पुतण्याचा छूपा वाद आता समोर येऊ लागला आहे.
टेंभुर्णी येथे जयंत पाटील यांच्या स्टेजवर देखील अनिल सावंत यांनी हजेरी लावली होती. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील विविध भागात अनिल सावंत यांच्याकडून गणपती मूर्तीचे मोफत वाटप करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात येत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भगीरथ भालके, प्रशांत परिचारक ,वसंत नाना देशमुख ,नागेश काका भोसले यांच्यासह अनेक दिग्गज तुतारीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असताना आता अनिल दादा सावंत यांनी थेट कामाला सुरुवात केली असून अनिल दादा सावंत यांच्या एंट्रीने या मतदारसंघातील रेस वाढली आहे. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठीा दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याच स्पष्ट होत आहे.
