#

Advertisement

Monday, September 30, 2024, September 30, 2024 WIB
Last Updated 2024-09-30T11:57:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हर्षवर्धन पाटील यांनी फेसबुकवर अकाउंटवरून "कमळ" हटवलं ?

Advertisement

पुणे :  जिल्ह्याच्या राजकारणातही मोठे बदल होत आहेत. इंदापूरमध्ये यंदा कोण आमदार होणार? याची जोरदार चर्चा रंगली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक बदल दिसतो आहे. या बदलामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय भूमिका ठरली असल्याचं बोललं जात आहे. हर्षवर्धन पाटील फेसबुकवर पोस्ट करत असताना भाजपचं कमळ चिन्ह असणारं पोस्टर शेअर करत होते. माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते. यासोबतच कमळ चिन्हही ते वापरत होते. मात्र आता त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये बदल केला आहे. आता माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचा उल्लेख ते करत आहेत. मात्र कमळाचं चिन्ह त्यांच्या सध्याच्या पोस्टमध्ये दिसत नाही. हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते लवकरच तुतारी हाती घेतील, असंही बोललं जात आहे. मात्र इंदापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र याला विरोध आहे.