#

Advertisement

Monday, September 30, 2024, September 30, 2024 WIB
Last Updated 2024-09-30T11:47:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राखीव मोहोळ मतदारसंघात कोणाला मिळणार उमेदवारी ?

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी महत्त्वाचा आणि राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात यंदा चांगल्याच घडामोडी पाहायला मिळत आहे. पारंपरीक राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ मानण्यात येणाऱ्या या मतदारसंघात राजन पाटील यांचं वर्चस्व आहे. मात्र, हा मतदारसंघ राखीव असल्याने गत 2019 च्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या पाठिंब्याने येथे यशवंत माने  यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली अन् ते आमदार बनले. मात्र, यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे येथील गणितं बदलली आहेत. राजन पाटील व यशवंत माने हे अजित पवारांसोबत असल्याने महायुतीकडून त्याचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. तर, यशवंत मानेंना टस्सल देण्यासाठी शरद पवारांच्या मोहोळ मधील स्थानिक नेत्यांची घोडदौड दिसून येते.
माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर, महायुतीमध्ये ही जागा आजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून इतर नेते महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी खिंड लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी माजी आमदार रमेश कदम यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. उद्योजक राजू खरे यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. तर, माजी मंत्री लक्ष्मणराव छोबळे यांचे सुपुत्र अभिजित ढोबळे यांनीही या विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली असून तेही वरिष्ठ पातळीवरुन नेतेमंडळींच्या संपर्कात आहेत. अॅड.पवन गायकवाड, शिवसेनेचे नागेश वनकळसे, शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, कॉंग्रेसचे रॉकी बंगाळे आदी नेतेमंडळी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येते. संजय क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता जिल्ह्याला आहे.