Advertisement
शिवसेना शिंदे गटार पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा
आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरुये पण आढळराव मात्र कुठं ही दिसून आलेले नाहीत. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
मात्र, हेच शिवाजी आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा आणि आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते. लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे अधिकची जवळीक साधत आहेत का अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळंच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की, आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते. या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.
