#

Advertisement

Thursday, September 12, 2024, September 12, 2024 WIB
Last Updated 2024-09-12T11:25:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचा नंबर?

Advertisement

शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळणार
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवारमराठा कार्ड खेळणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. 
राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच बीड परळी या भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला. राज्यात मराठा आरक्षणाचा बीड, जालना हा भाग केंद्रबिंदु ठरला होता. त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.