#

Advertisement

Tuesday, September 3, 2024, September 03, 2024 WIB
Last Updated 2024-09-03T17:52:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कोल्हापुरात "तुतारी"साठी मेव्हणे-पाहुणे शरद पवारांकडे

Advertisement

कोल्हापूर : जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना महायुतीमधील अनेक इच्छुक भेट घेत आहेत. विशेष करून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि मेव्हणे पाहुणे असणारे माजी आमदार के पी पाटील, ए. वाय. पाटील यांनी शरद पवार याची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. हे दोघं तिथं असतानाच नुकताच भाजपला राम राम केलेले भाजपचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवार याची भेट घेत निवडणूक लढवण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी केली आहे.दोन पाटील तिथं असतानाच राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतली. देसाई यांनी नुकतंच भाजपचा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.  जागावाटपात राधानगरी मतदारसंघ  शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळेच के.पी.पाटील आणि ए.वाय.पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. मात्र शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे.