#

Advertisement

Monday, September 2, 2024, September 02, 2024 WIB
Last Updated 2024-09-02T17:47:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत जय पवारांचं नाव चर्चेत

Advertisement

बारामती : बारामतीत अजित पवारांनी रोड शो केला.. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रॅलीत त्यांचे चिरंजीव जय पवारही सहभागी झाले होते.. रॅलीच्या माध्यमातून जय पवारांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन केलं.. बारामतीची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जय पवारांचं नाव चर्चेत आहे. तेव्हा विधानसभेसाठी संधी मिळाल्यास नक्की उभा राहणार असं विधानही जय पवारांनी केल आहे.
अजित पवारांच्या रॅलीत सर्वांचं लक्ष दादांच्या पोस्टरकडे वेधलं जात होतं.. अजित पवारांच यंदाचे मुख्यमंत्री असे पोस्टर्स बारामतीत लावण्यात आले होते. दादांना मुख्यमंत्री बनवायचं ही सर्वांचीच इच्छा आहे असं म्हणत जय पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्तेही खुले केले आहेत.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा सवाल अजित पवारांना याआधी विचारण्यात आला होता. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवणार असं उत्तर दादांनी तेव्हा दिलं होतं. मात्र आता अजित पवारांचेच भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागलेत. त्यामुळे येत्या विधानसभेत अजितदादा जागापाटपात मोठा वाटा मागणार का? ज्याच्या जागा सर्वाधिक त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.