#

Advertisement

Monday, September 9, 2024, September 09, 2024 WIB
Last Updated 2024-09-09T11:35:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता

Advertisement

मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच
नाशिक : ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. नाशिकच्या येवला दौऱ्यावर आले असता ते येवल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे त्यांनी यावेळी दिली. जागा वाटपाबाबतीतही मत व्यक्त करतांना भुजबळ म्हणाले की, महायुतीतील घटक पक्षांना समान न्याय मिळेल, असा संदेश दिल्लीच्या नेत्यांनी दिला आहे.
महायुती सरकार विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मंजूर केले आहे. त्याचा लाभ मराठा बांधवांना होतोय, असेही भुजबळ म्हणाले. अजित पवार आमचे कॅप्टन आहे. त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही. ते बारामतीतूनच लढतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.