#

Advertisement

Friday, September 6, 2024, September 06, 2024 WIB
Last Updated 2024-09-06T13:01:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले

Advertisement

पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याने एकच राडा झाला तब्बल दोन तास गदारोळ सुरू होता. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं निमित्त असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीची झालर सुद्धा या सभेला होती. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तणाव वाढू न देता हस्तक्षेप केला. अजित पवार गटांचे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधांत विधानसभा लढण्यास इच्छुक असलेले शरद गटाचे देवदत्त निकम या दोघांच्या कार्यकर्त्यात राडा झाला. आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आल्याचा आरोप निकमांनी केला. या मुद्द्यांवरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. खुर्च्या नाचवत हिणवत होते. यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा होतच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. यानंतर देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले.