#

Advertisement

Friday, September 6, 2024, September 06, 2024 WIB
Last Updated 2024-09-06T12:52:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपच्या चार दिग्गज नेत्यांवर विधानसभेची जबाबदारी

Advertisement

मुंबई : भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. 

नितीन गडकरी राज्याचा दौरा करणार 
लोकसभा निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे. यामुळे कुठलाही धोका पत्करायला नको म्हणून नितीन गडकरी राज्याचा दौरा करणार  आहेत.