#

Advertisement

Wednesday, September 4, 2024, September 04, 2024 WIB
Last Updated 2024-09-04T18:06:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश...

Advertisement

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकता महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढणार असल्याचं मनसेने निश्चित केलं आहे. इथल्या सर्वच जागांचा आढावा घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
मनसेने केलेल्या सर्वेक्षणातून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या विरोधात नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चारही जिल्ह्यांकडे मनसेने विशेष लक्ष दिलं आहे. 225 जागेवर विधानसभा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. आजच्या बैठकीत चारही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही युती नसल्याचे सांगत कामाला लागण्याची दिली सूचना देण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंनी चार ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे राज ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांवर फोकस करण्यात आला. सोलापूर, धाराशिव, नांदेड ,लातूर, हिंगोली, परभणी, बीड जालना ,संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे यांनी भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती.