Advertisement
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास 60 टक्के पुर्ण झाल्याची माहिती आहे.
विधानसभाच्या 288 पैकी 100 जागा काँग्रेस, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, असे बोलले जात आहे. तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचं ठरल आहे. तीनही पक्षाच 60 टक्के जागांवर एकमत असल्याची माहिती आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम पण लवकरच सोडवला जाणार आहे.
विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा करण्यात आली आहे. 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिल्याची माहिती समोर आली आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
