#

Advertisement

Friday, September 6, 2024, September 06, 2024 WIB
Last Updated 2024-09-06T17:49:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट ? अजित पवार यांचा इशारा

Advertisement

गडचिरोली : वस्तादने एक डाव राखून ठेवलाय..तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका...असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे.  राजकीय परिस्थिती वेगळी झाली आहे. विरोधकांकडून घरं फोडण्याचे काम सुरू आहे. आत्राम यांनी मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापा विरोधात लोकसभा निवडणुकीत उभी राहण्याची भाषा करत आहे.  आम्ही चूक केली. त्याबद्दल जाहीरपणे बोललोही. तुम्ही करू नका, बापासोबत रहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे भावनिक आवाहन त्यांनी केले. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.