#

Advertisement

Friday, September 6, 2024, September 06, 2024 WIB
Last Updated 2024-09-06T17:37:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दत्तात्रय भरणेंकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर

Advertisement

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार ? 

पुणे : महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला जागा असा फॉर्म्युला निश्चित मानला जात आहे. त्यातच, आता इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपचे इच्छुक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जाणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावात ग्रामस्थांशी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी चक्क स्वत:ची उमेदवारीच जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी काम केलंय, मनापासून काम केलंय, तुम्हाला सभामंडप दिलं असेल, व्यक्तिगत कामासाठी माझा उपयोग झाला असेल तर मलाच आशीर्वाद द्या, असेही भरणे यांनी म्हटले.  दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे महायुतीचे जागावाटप झालं नाही, पण अजित पवारांनी इंदापूरची जागा ही विद्यमान अमादार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असे संकेत दिले होते. वर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता तर थेट दत्तात्रय भरणे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केल्याने इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.