#

Advertisement

Tuesday, September 10, 2024, September 10, 2024 WIB
Last Updated 2024-09-10T12:23:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अभिजित ढोबळे राष्ट्रवादीच्या संपर्कात ; चर्चा मात्र वेगळीच...

Advertisement

सोलापूर : भाजपचे प्रवक्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते मोहोळ मतदारसंघातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची अभिजित ढोबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये भेट घेतली. ते उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असले तरी चर्चा मात्र वेगळीच आहे. 
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लोकसभा निवडणुकीत कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी ढोबळे यांना पक्षश्रेष्टीं यांच्याकडून आश्वसन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी संयमी भूमिका घेतली. मात्र आता यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे यांनी भाजप मधून बाहेर पडत स्वतंत्र राजकीय चूल मांडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यापूर्वी 2009 मध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी मोहोळ विधानसभा लढवली होती. त्यांनी पाच वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. अभिजित ढोबळे यांना राजकारणात स्टँड करण्यासाठी सरांचा प्रयत्न सुरू आहे. याच राजकीय भांडवलावर अभिजित ढोबळे राजकारणात स्थिरावू पाहत आहेत. परंतु, ग्राउंड लेव्हला वेळीच चर्चा असून त्यांच्या भगिनी ऍड. कोमलताई साळूंखे - ढोबळे यांना लक्ष्मण ढोबळे यांनी संधी द्यावी, असा सूर उमटत आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.