Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना पक्षफुटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी मागितलं असतं तर पक्षाने त्यांना हवं ते दिलं असतं. पक्ष तोडण्याची काय गरज होती? इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीने पक्षाचे 2 गट निर्माण झाले. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. यासंबधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांना पक्षात ठेवायचं होतं, परंतु त्यांनीच आमचं आयुष्य अस्त व्यक्त करत सोडून जाण्याचा निर्णय घेतला असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कधीही पक्षात नेतृत्वाची मागणी केलेली नाही. अजितदादा हे मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न काही करत होते. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या या निर्णयामागे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यात सुप्रिया सुळेंना पक्षाचं नेतृत्व हवं होते असं देखील म्हटलं गेलं, अजित पवारांना त्यांच्या मनासारखं पद दिलं गेलं नसल्याचंही अनेकांनी म्हटलं. त्या चर्चांचं सुप्रिया सुळेंनी खंडन केलं. मला पक्षाचं नेतृत्व अजित दादाना देऊन आनंद झाला होता, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
