Advertisement
चिंचवड : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटली तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे, असं म्हणत नाना काटेंनी बंडखोरी करणार हे स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांशीमाझं बोलणं झालेलं आहे, माझ्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. दादांनी सांगितलं आपण चिंचवड विधानसभेची जागा मागणार आहोत. तू तुझ्या पध्दतीने नागरिकांशी संवाद साध, तयारी कर, असं अजितदादांनी सांगितलं असल्याचं नाना काटेंनी म्हटलं आहे. ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना शिंदे गटाला न मिळता भाजपला मिळाली तरी ही मी निवडणूक पक्ष चिन्हावर निवडणूक लढणार आहे, माझ्यासाठी इतर पक्षांची देखील पर्याय असल्याचं नाना काटे यांनी म्हटलं आहे, तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत. तर त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन असं नाना काटे म्हणाले आहेत. नाना काटे शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी फुंकणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
