#

Advertisement

Thursday, September 19, 2024, September 19, 2024 WIB
Last Updated 2024-09-19T10:33:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?

Advertisement

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अजित पवार यांचा फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो करण्यात आल्याने पक्षाने याबाबत संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आहेत.त्यामुळे काही जणांना पोटशुळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजितदादा पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजबाबत घडला आहे. 
 या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.