#

Advertisement

Monday, September 30, 2024, September 30, 2024 WIB
Last Updated 2024-09-30T11:33:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांकडून फोनवरुनच फलटणची उमेदवारी जाहीर

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही 

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना फोन करुन दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. फलटण हा अनूसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून यापूर्वी तीन टर्ममध्ये दीपक चव्हाण निवडून आले आहेत.  रामराजे नाईक निंबाळकर यांची सोळशीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडे जाण्याची शक्यता असून त्यांच्याकडून उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झालेलं नाही. 
साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधत आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. यापार्श्वभूमीवर  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट अजित दादा पवार यांनी फोन द्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.