#

Advertisement

Monday, September 30, 2024, September 30, 2024 WIB
Last Updated 2024-09-30T11:17:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार

Advertisement

रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत 
अकलूज : माढा लोकसभा जिंकणारे फडणवीस यांचे निकटवर्तीय रणजीत सिंह मोहिते पाटील आता पुन्हा तुतारी घेऊन माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी तुतारी हातात घेत भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेतला होता. 
यावेळी भाजपने विधानपरिषद दिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे प्रचारात कुठेही आले नसले तरी पडद्यामागून सूत्रे हालवत त्यांनी माढा व सोलापूर या दोन्ही जागा जिंकण्यास महाविकास आघाडीला मोलाचे सहकार्य केले होते. आता विधानसभेला रणजितसिंह मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असतानाच अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या मेळाव्यात रणजीत दादा नुसते स्टेजवरच नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिला. अकलूजच्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कानात सातत्याने बोलणारे रणजीत दादा ज्या वेळेला भाषणाला उभारले त्या वेळेला सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत, असे सांगत पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. 
आता यावेळी माढा विधानसभेतून रणजीत सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचेच गणित शरद पवार सध्या मांडत असून त्यामुळेच काल झालेल्या कार्यक्रमात रणजीत सिंह मोहिते पाटील हे उघडपणे स्टेजवर आले आणि त्यांनी भाषणही केले. सध्या माढा विधानसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी लागली असून हे बहुतांश इच्छुक उमेदवार अकलूजच्या कार्यक्रमाला हजर होते. या सर्वांसमोर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले तडजोडीचे संकेत हे राष्ट्रवादी गटात प्रवेशाची नांदी असून तसे झाल्यास भाजपाला मोहिते पाटील घरातील उरलेल्या एकमेव सदस्याचा पाठिंबाही गमवावा लागणार आहे.