Advertisement
मस्जिदमध्ये घुसून मारु' वक्तव्य भोवले
अहमदनगर : मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान नितेश राणेंना भोवण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदू समाजातील अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी नितेश राणेंनी ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडकाऊ भाषण देणे आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुस्लिम समाजाला उघड धमकी दिली होती. एका एकाला पकडून मारु, असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात कलम 302, कलम 153 सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
