Advertisement
जबाबदारी देऊ, कोणालाही नाराज करणार नाही : सुप्रिया सुळे
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार प्रक्षात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संपूर्ण राज्यभरातून 1680 अर्ज आले असुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मिळून 1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत. मुंबई आणि कोकणातील 400 इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून मुंबईत होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पवारांनी घेतल्या आहेत, याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी फॉर्म भरले आहेत, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्याच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि उच्चशिक्षित लोक मुलाखतीसाठी आलेले आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना तिकीट देणे शक्य नाही काही नाराज होतील पण आम्ही संघटनेमध्ये पूर्ण ताकतीने त्यांना जबाबदारी देऊ असंही सुप्रिया सुळेंनी टलं आहे. पंचायत राज इलेक्शन आमच्या सरकार आल्यावर आम्ही तातडीने घेऊ आणि त्या लोकांना जबाबदाऱ्या देऊ. प्रत्येक जणांचे मेरिट बघून त्यांना संघटनेत किंवा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधान्याने जबाबदारी देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी संपूर्ण राज्यभरातून 1680 अर्ज आले असुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मिळून 1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत. मुंबई आणि कोकणातील 400 इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून मुंबईत होणार आहेत.
