#

Advertisement

Wednesday, October 9, 2024, October 09, 2024 WIB
Last Updated 2024-10-09T12:31:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढा विधानसभा मतदारसंघात पवारांसमोर नवीन ट्विस्ट

Advertisement

अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. अशातच यामध्ये आणखी एक मोठं नाव सामील झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची उमेदवारी शरद पवार निश्चित करतील अशी चर्चा असताना आता थेट मोहिते पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरायची तयारी करू लागल्याने पवारांसमोरही नवीन ट्विस्ट उभा राहिला आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेतून शरद पवार गाटकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबतचे संकेत रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघात रोज नवनवीन वेगवान घडामोडी घडत आहेत. आता मोहिते पाटील कुटुंबातील कोणीही विधानसभा रिंगणात उतरावे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागल्याचे शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील कुटुंबातील एकाने उभारावे ही जनतेची मागणी असून त्यासाठीचा दबाव वाढू लागल्याचे आज शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. आपण गेले दोन ते तीन वर्ष माढा विधानसभेचे काम पाहत असून ज्या पद्धतीने माढ्यात लोकांचा आग्रह वाढत चाललेला आहे ते पाहता ही बाब आपण शरद पवार जयंत पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक काल माढा विधानसभेसाठी च्या मुलाखती पुण्यात झाल्या होत्या. यावेळी मोहिते पाटील यांनी मुलाखत दिली नव्हती. आपण पक्षाकडे जाहीर उमेदवारी मागितली नव्हती. मात्र, लोकांचा आग्रह वाढत चालल्याने आता ही बाब आपण कुटुंबाच्या आणि पक्षाच्या कानावर घालणार असून यानंतर शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले.