Advertisement
सोलापूर : लोकसभेच्या वेळी शरद पवारांनी सोलापूरच्या मोहिते पाटलांना पक्षात प्रवेश घेऊन आपल्या गटातून उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला. त्यामुळे पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांना परतीचे वेध लागल्याच दिसत आहे.
लोकसभेत माढा पॅटर्न राबवल्यानतंर आता त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते आता शरद पवारांकडे परतण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे.
कागलमध्ये समरजीत घाटगेंनी सर्वप्रथम हाती तुतारी घेण्याचं निश्चित केल्यानंतर इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर रामराजे निंबाळकरांचाही मुहूर्त ठरला आहे.
हे नेते तुतारी हातात घेऊ शकतात..
1) मदन भोसले- वाई विधानसभा
2) विवेक कोल्हे- कोपरगाव विधानसभा
3) बाळा भेंगडे- मावळ विधानसभा
4) बापू पठारे - वडगाव शेरी
5) प्रशांत परिचारक- पंढरपूर-मंगळवेढा
6) राजन पाटील- मोहोळ विधानसभेत वर्चस्व
7) बबन शिंदे- माढा
8) दिलीप सोपल- बार्शी
9) रमेश कदम- मोहोळ विधानसभा
