#

Advertisement

Monday, October 21, 2024, October 21, 2024 WIB
Last Updated 2024-10-21T12:50:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांचा पॅटर्न : 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप

Advertisement

मुंबई :  विधानसभा निवडणूक  पार्श्वभूमीवर अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.

17 जणांना एबी फॉर्मचं वाटप

  1. राजेश विटेकर 
  2. संजय बनसोडे
  3. चेतन तुपे
  4. सुनील टिंगरे
  5. दिलीप वळसे पाटील
  6. दौलत दरोडा
  7. राजेश पाटील
  8. दत्तात्रय भरणे
  9. आशुतोष काळे
  10. हिरामण खोसकर 
  11. ⁠नरहरी झिरवळ
  12. ⁠छगन भुजबळ
  13. ⁠भरत गावित 
  14. ⁠बाबासाहेब पाटील
  15. ⁠अतुल बेनके