#

Advertisement

Monday, October 21, 2024, October 21, 2024 WIB
Last Updated 2024-10-21T13:06:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...!

Advertisement

उमेदवारी न मिळाल्यानं सुवर्णा पाचपुते यांच्या डोळ्यात अश्रू

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच भाजपकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. ज्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेगही आला.
भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी दिली. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे' असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवल खरं. मात्र भाजपचं पक्ष चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांचा कंठ दाटून आल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. तसंच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला.