#

Advertisement

Tuesday, October 1, 2024, October 01, 2024 WIB
Last Updated 2024-10-01T11:31:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपूर मंगळवेढातून सावंत यांनी मागितली उमेदवारी

Advertisement

अनिल सावंत तुतारीकडूनच निवडणूक लढवणार 

पंढरपूर : राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेल्या तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंतयांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चेला सुरुवात झाली होती. शरद पवार यांच्यात सोबत राहण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. मी या वेळेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची तुतारी मागितली आहे.  यासाठी पवार साहेब व सुप्रियाताई यांची भेट घेतली आहे. माझी या मतदारसंघासाठी असणारी विकासाची भूमिका मी साहेबांना सांगितली आहे, शरद पवार यांचे विचार आपल्याला पहिल्यापासून भावतात. त्यामुळे आपण शरद पवार यांच्याच पाठीशी राहणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत राहायचे असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत. मात्र, माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले.