Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीचे तब्बल 250 जागांवर एकमत झाले असून असून दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार आहेत. मात्र अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आह. साधारणपणे 250 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. या जागांचे जागावाटप महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत 250 जागांवर एकमत झाले असून अद्याप 38 जागांचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीत बैठक होणार आहे. या बैठकीत 38 जागांवर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 38 जागांमध्ये काही ठिकाणी 2 पक्ष तर काही ठिकाणी 3 पक्षांचा दावा आहे.
विदर्भातील काही जागांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. मुख्यत्वे करून नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीची चर्चा झाल्याची माहिती आहे. विदर्भातील जागा संदर्भात पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये एकूण 12 जागांवर तिढा होता. बारा पैकी सहा जागांचा तिढा सुटला आहे.
