Advertisement
इंदापूरात मेळावा घेत शरद पवारांना इशारा दिला
इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात शरद पवारांच्या पक्षातील नेते एकवटल्याचं चित्र इंदापूरात दिसून आलं. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत आज इंदापुरात परिवर्तन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल. असा इशारा दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून इशारा दिला आहे. परिवर्तन मेळाव्यावेळी बोलताना अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, आज इंदापुरात मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. इंदापूर तालुक्यात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्याच्यांमध्ये धमक असते तोच काम करतो. लोकांसमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. गेल्या आठ दिवसांमध्ये काय घडामोडी घडल्या, लोकसभा निवडणुकामध्ये कोणी-कोणी प्रामाणिक काम केले ते कळायला हवं. गेल्या 20-25 वर्षे राजकारणात जबाबदार व्यक्ती म्हणून काम करत आहे.
लोकांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवाव्या म्हणून परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांना संधी द्यावी पाच वर्षात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आमची क्षमता आहे.या मेळाव्याची उपस्थिती पाहून कळते की आमचे काम चालते आहे. दहा वर्षे ज्यांना घरी बसवले त्यांनाच पक्षाने उमेदवार जाहीर केली. लोक प्रामाणिकपणाला साथ देतात. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हे लक्षात घ्या, शरद पवार यांनी आपला इंदापूरमधील निर्णय मागे घ्यावा नाहीतर मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल असा इशारा दशरथ माने परिवर्तन मेळाव्यातून दिला आहे.
