Advertisement
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर : भाजपचा ढासळलेला गड सावरण्यासाठी मैदानात
सोलापूर: भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचा दौरा होत आहे . हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा असून भाजप समोरील आव्हाने देवेंद्र फडणवीस कसे पेलणार, हे यावेळी दिसून येणार आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता पंढरपूर, मंगळवेढा येथून दौऱ्याची सुरुवात होत असून मतदारसंघासाठी महत्वाच्या असणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
उपसा सिंचन योजनेमुळे मंगळवेढ्यातील कायम दुष्काळी 35 गावांचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय पंढरपूर एमआयडीसी चे भूमिपूजन देखील फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन देखील फडणवीस करणार आहे. याशिवाय अजून या मतदारसंघातील अनेक योजनांची भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत. यानंतर फडणवीस यांच्या उपस्थितीत आंधळगाव येथे शेतकरी मेळावा होणार आहे. यानंतर फडणवीस हे अक्कलकोट येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अक्कलकोट येथे जाणार आहेत.
हे उपस्थित राहणार की नाही ?
पंढरपूर मंगळवेढा आणि अक्कलकोट हे दोन्ही मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरू असून परिचारक या वेळेला बंडखोरी करून तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात परिचारक उपस्थित राहणार का? त्यांचे समाधान देवेंद्र फडणवीस करणार का? अशा अनेक गोष्टी सोमवारी पाहायला मिळणार आहे त्या तुलनेने अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची परिस्थिती चांगली आहे.
