#

Advertisement

Saturday, October 5, 2024, October 05, 2024 WIB
Last Updated 2024-10-05T18:04:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जुन्नरमध्येही शरद पवारांचे धक्कातंत्र ?

Advertisement

अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत मैदानात उतरवणार 

जुन्नर : लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवार आता विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहेत. अजित पवारांच्या आमदारांविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवारांनी अनेक मोहरे मैदानात उतरवले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवार आयात करत असताना शरद पवारांनी आता जुन्नरमध्ये अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात निष्ठावंत चेहरा मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.  मोहित ढमाले 2017 ते 2022 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही  काम पाहिले आहे. 
मोहित ढमाले यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर ठामपणे शरद पवार यांची साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते. मोहित ढमाले पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी यांनी केली आहे.  विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार हे मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.