#

Advertisement

Saturday, October 5, 2024, October 05, 2024 WIB
Last Updated 2024-10-05T10:58:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

Advertisement

एकनाथ शिंदे  8 ऑक्टोबरला निर्णय घेणार 

माढा : महायुतीतून माढा मतदारसंघातून शिवसेना लढण्याच्या तयारीला लागली आहे. याबाबत 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात र्निणय होण्याची  शक्यता असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितले  शिवाजी सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू असून गेल्या 30 वर्षापासून ते माढा तालुक्यात राजकारणात सक्रीय आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पारंपारिक विरोधक म्हणून शिवसेनेने आजवर काम केले आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी शिवाजी सावंत यांची ओळख आहे. शिंदेंच्या विरोधात जवळपास 70 ते 75 हजार मते त्यांनी घेतली आहेत.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा यांच्या सोबत आलेल्या आमदार बबनदादा शिंदे यांनी लोकसभेतील पराभवानंतर अजितदादा यांची साथ सोडत पुन्हा स्वगृही म्हणजे शरद पवार गटात जाण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.
माढ्यातून शरद पवारांनी जर तिकीट दिले तर आपण मुलाला म्हणजे रणजित शिंदे यांना उभे करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. जर तिकीट नाही मिळाले तर अपक्ष उभे करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळं महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे . यातच आमदार शिंदे यांनी आता महायुती हा विषय आपल्यासाठी संपल्याचे जाहीर केल्याने महायुती मधील स्थानिक नेते व कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यामुळेच आता माढा मतदारसंघ शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढून जिंकेल असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे.