#

Advertisement

Saturday, October 5, 2024, October 05, 2024 WIB
Last Updated 2024-10-05T11:40:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी !

Advertisement

उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत : अजित पवार गटात खदखद 

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देखील राजकीय वातावरण तापलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेली अंतर्गत खदखद समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि माजी आमदार आणि नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्ष झालेले राजन पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे. याला कारण म्हणजे उमेश पाटील यांनी केलेली फेसबूक पोस्ट. मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय अशी पोस्ट उमेश पाटील यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 
मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने हे आहेत. ते राजन पाटील यांचे समर्थक आहेत. मात्र, आता मोहोळ तालुक्यात आमदार बदलण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच त्यांना उमेदवारीसाठी विरोध होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला. 
दरम्यान, यामुळे राजन पाटलांचे विरोधक आणि अजित पवारांचे समर्थक उमेश पाटील नाराज झाले आहेत. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतय याचं वाईट वाटतं.  ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेलाय, अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली होती. उमेश पाटील यांनी थेट मी राजीनामा लिहून ठेवला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सोबत राहिलेले उमेश पाटील आता अजितदादांची साथ सोडतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.