#

Advertisement

Tuesday, October 1, 2024, October 01, 2024 WIB
Last Updated 2024-10-01T17:08:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढ्यात बाहेरील उमेदवार दिल्यास पराभव करू

Advertisement

 संजय घाटणेकरांचा पवार गटाला इशारा 
सोलापूर : माढा विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असतानाच माढा विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असतानाच यंदा उमेदवारी माढ्यातील भूमिपुत्राला द्या, त्याऐवजी माळशिरस किंवा पंढरपूर येथे उमेदवारी दिल्यास येथील स्वाभिमानी जनता त्यांना पराभूत करेल असा इशारा संजय पाटील घाटणेकर यांनी दिला. विशेष म्हणजे संजय घाटणेकरांनी हा इशारा मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यासमोरच दिल्याने मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माढा विधानसभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातून भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील किंवा शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरचे अभिजित पाटील हे देखील माढ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. 
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी मोहिते पाटील यांच्या समोरच बाहेरचा उमेदवार येथील स्वाभिमानी जनता सहन करणार असा इशारा दिला. मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात.