#

Advertisement

Tuesday, October 1, 2024, October 01, 2024 WIB
Last Updated 2024-10-01T12:02:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

BRS ची शाखा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये विलीन होणार

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिन होणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे.
महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील बीआरएसचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. राज्यातील बीआरएस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकांपू्र्वी शरद पवारांची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकांपूर्वी बीआरएस पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. मोठं शक्तिप्रदर्शन करत भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. पण, अवघ्या काही महिन्यांतच महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता गाशा गुंडाळणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. येत्या 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षातील सर्व पदाधिकारी थोरल्या पवारांच्या पक्षात विलिन होणार असल्याची माहिती मिळत आहे.