Advertisement
शरद पवार गटात प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज मुंबई येथे भेट घेतली. बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा राजीनामा देण्यासाठी ढोबळे यांच्यावर दबाव आणून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा आग्रह धरला होता. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळं लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
दरम्यान, लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, अद्याप मी राजीनामा दिलेला नाही. त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं की पक्षाचा राजीनामा द्या. त्यावर त्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून विचार करुन निर्णय घेईन.
