Advertisement
हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आमदार भरणे यांची प्रतिक्रिया
इंदापूर : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयावर त्यांचे विरोधक आणि अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच माहिती आहे. अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इंदापुरात महायुतीची उमेदवारी देखील मिळवली होती. मात्र, त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा जवळपास 2 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी काळातही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच लढत होईल, असे बोलले जात आहे.
