Advertisement
सोलापूर : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले आहे. यात बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी चर्चेत असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झाली आहे. नवनिर्वाचित पालकमंत्री गोरे यांची भेट घेत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, सोलापूरच्या प्रश्नांवर आगामी काळात लक्ष देण्याची आग्रही विनंती केली. ढोबळे यांनी एकेकाळी अहिल्यानगरचे पालकमंत्री पद भूषविले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा राष्ट्रवादीकडेच आले आहे. अदिती तटकरे यांना रायगड जिल्हाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.वाशीममध्ये हसन मुश्रीफ यांना, नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील, बुलढाणामध्ये मकरंद पाटील यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अजित पवार यांना बीडसह दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. अजित पवार हे बीड तसेच पुणे जिल्ह्याचे पालमंत्री बनले आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई या दोन शहरांचे पालकमंत्री असतील. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कडे ठेवलंय. मुंबई उपनगरासाठी 2 पालकमंत्री असणार आहेत. कोल्हापूरला 2 पालकमंत्री देण्यात आले आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे.
कोणाला डच्चू?
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली नाही. मंत्री दत्तामामा भरणे यांना देखील पालकमंत्री पदापासून वंचित ठेवल्याने आले आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी वारंवार ती बोलूनही दाखवली होती. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
