Advertisement
सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांची ४१ वी पुण्यतिथी निमित्त त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व कासेगांव येथील त्यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याला अनेक व्यक्ती, संस्थांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री तथा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनीही अभिवादन केले. सांगली जिल्ह्याच्या जडणघडणीत राजारामबापू पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्थांचे जणू जाळे निर्माण केले. याबाबत ढोबळे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

