Advertisement
मुंबई : तिन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचं स्पष्ट म्हटल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते कौतुक करत आहेत.
या पार्शवभूमीवर एका खासगी वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना यावेळी विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचं असतं. कौतुकांबाबत सतर्क रहायचे असते. अनेकदा राजकारणात फुट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केल जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमीनीवर असले पाहिजेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशा कौतुकापासून सावध राहणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटल आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी 24 तास काम केले. सत्ता स्थापन करताना काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चर्चा कराव्या लागतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिघांना एकमेकांचा फायदा झाला. देश सेवा आणि समाज सेवा असा मंत्र मला लहानपणापासुनच संघाकडून मिळाला आहे. आम्हाला मिळालेले पद हे पद नसून ती एक जबाबदारी असल्याचं फडणवीस यांनी म्हटल आहे
