#

Advertisement

Monday, January 13, 2025, January 13, 2025 WIB
Last Updated 2025-01-13T11:33:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शाहू शिक्षण संस्थेद्वारे "फिट इंडिया मॅरेथॉन"

Advertisement

पश्चिम महाराष्ट्रातील  २०५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

मंगळवेढा : अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारच्या फिट इंडिया धोरणानुसार व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत २०५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दि. ११ जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, कराड, सातारा, लातूर, सोलापूर येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. शहरातील शिवप्रेमी चौकातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, क्रीडा प्रशिक्षक रामभाऊ दत्तू, आलम्पीक संघटनेचे अजय साळुंखे, गटशिक्षणाधिकारी डॉ. विभीषण रणदिवे, डॉ. अतुल निकम, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी, प्रा. विनायक कलुबमें, शॉरोन ढोबळे,  क्रांती आवळे, ब्राहम आवळे, प्रकाश गायकवाड, नंदकुमार हावनाळे, लहू ढगे, मधुकर भंडगे, शिवानंद माळी, दादासाहेब वाघमारे, सतीश कदम, अप्पासाहेब काटकर, बसवराज कोरे, प्रवीण गुंड, सुधीर नाईकनवरे आदी उपस्थित होते.

यामध्ये १४ वर्षे वयोगटात दोन कि.मी. अंतरातमध्ये १४ वर्षाखालील मुले रविराज नरळे प्रथम (पडोळकरवाडी), रोहन प्रक्षाळे व्दितीय (जि. प. शाळा फूल चिंचोळी), संकेत प्रक्षाळे तृतीय (तारापूर, पंढरपूर), १८ वर्षाखालील मुले चार कि.मी.मध्ये सिद्धनाथ जगताप प्रथम (कराड), हर्ष खांडेकर व्दितीय (पाठखळ), वैभव ढगे तृतीय (भाळवणी), खुल्या गटात सहा कि.मी.मध्ये सुशांत सरगर प्रथम (कोळा, सांगोला), निरंजन सूर्यवंशी व्दितीय (कराड), तुषार आलदर तृतीय (कोळा, सांगोला), विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार व उत्तेजनार्थ ५०० रुपये यासह सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात आले. 

स्पर्धेसाठी धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांनी सहकार्य केले. तर, या स्पर्धेसाठी जयंत डोलारे, अंबादास पांढरे, चिदानंद माळी, चंद्रकांत लाड, महेंद्र शिंदे, तानाजी देशमुख, राजाराम दत्तू, कृष्णदेव चौगुले, दत्तात्रय धुळगुंडे, रामेश्वर भोसले, खंडाप्पा जिरगे, प्रशांत यादव, सुनील साळे, प्रकाश माळी, डॉ. अशोक पाटील, संजय घोडके, विठ्ठल बगले, यशवंत चौगुले, आकाराम दुधाळे, श्रीकृष्ण कोळी, नानासाहेब खराडे, संजय भोसले आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कांतीलाल इरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी केले. आभार बसवराज कोरे यांनी मानले.