#

Advertisement

Saturday, January 11, 2025, January 11, 2025 WIB
Last Updated 2025-01-11T11:59:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"साहेबांच्या" राष्ट्रवादीत ढोबळे यांना कोणते नवे पद मिळणार?

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काही संघटनात्मक बदलांचे वारे वाहू लागले आहे. मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील, असे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिले आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांचे जुने स्नेही लक्ष्मणराव ढोबळे यांना पवार साहेब कोणते नवे पद देणार, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सुचवल्याचं पाहायला मिळालं. तर ज्या पदाधिकाऱ्यांच्या दोन ते तीन टर्म झालेत त्यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे इतर नेत्यांना संधी मिळेल असं म्हणत विकास लवांडे यांनी ही जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे.
राजकीय घडामोडीत महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पुनर्स्थापना करण्यात आली त्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्त्व मानणारे अनेक मातब्बरांची घरवापसी झाली, त्यामध्ये पवार यांच्या जवळचे मित्र आणि शिष्य अशी ओळख असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनीही भाजपला रामराम करीत पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सोलापुरातील चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती, ती ढोबळे यांनी यशस्वीरीतीत्या पार पडली. राष्ट्रवादी काँग्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांची ओळख आहे. आता, आगामी काळात होणाऱ्या राजकीय घडामोडी लक्षात घेता शरद पवार यांना लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सारख्या नेत्यांची गरज भासणार आहे, त्यामुळे ते ढोबळे यांना कोणते पद देणार हे महत्वाचे ठरणार आहे. सध्या, ढोबळे यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्ष पद आहे. 


शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेले आहेत. शरद पवार यांच्या हातून त्यांचा पक्ष आणि चिन्हही गेलं आहे. मात्र, शरद पवार यांनी हार न मानता आपला लढा सुरू ठेवलाय. मात्र, दुसरीकडे पहिली फळी पक्ष सोडून गेल्यानं सध्याच्या नेत्यांमध्ये पहिल्या फळीत कोण यावरून सुप्त संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.